'योगशिक्षक' व्हायचंय ? 'येथे' घेऊ शकता प्रशिक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2019
Total Views |


 


मुंबई : योगशास्रात मागील ४२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या 'योग विद्या निकेतन' संस्थेच्या 'योग शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम' या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु झाले आहेत. सुप्रसिद्ध योगतज्ञ पद्मश्री सदाशिव निंबाळकर हे या संस्थेचे संस्थापक संचालक असून त्यांच्या मार्गदर्शखाली हा पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. एका वर्षाचा हा अर्धवेळ पदविका अभ्यासक्रम असून दादर आणि वाशी या दोन ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत.

 

दादर शाखेत ४३ वा योगशिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम १५ जुलै २०१९ पासून सुरू होणार असून या अभ्यासक्रमात प्राचीन योगशास्राबरोबरच शास्रशुध्द पध्दतीने आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा आणि शुध्दिक्रिया, शरीरशास्र, शरीर विज्ञानशास्र तसेच शैक्षणिक मानसशास्त्र हे विषय शिकवले जातात. यासाठी बारावी पास शिक्षणाची अट आहे. हा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेतून शिकवला जातो.

 

ज्यांना योगशिक्षक म्हणून आपली कारकीर्द घडवायची असेल त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असल्याचे संस्थेमार्फत सांगण्यात आले. या पदविका अभ्यासक्रमासाठी आपण इच्छुक असाल तर 9969011514, 9819295201, 998772213, 9820528484 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@