मराठा आरक्षण : वैद्यकीय प्रवेश यंदापासूनच, उच्च न्यायालयाचा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2019
Total Views |


 


मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई उच्च न्यायालयात जिंकल्यानंतर पुन्हा एकदा मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशाबद्दल आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. वैद्यकीय महाविद्यालीन प्रवेशासाठी पुढील वर्षापासून आरक्षण लागू करावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळत मराठा विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

 

वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच मराठा आरक्षण देण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशात यंदापासूनच आरक्षण मिळणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षण अवैध असल्याचे सांगत आता याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 

२७ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा करत मराठा आरक्षण वैध ठरवले होते. त्यानंतर डॉ. जयश्री पाटील यांच्यावतीने अॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@