कंगनाने भारतीय प्रसार माध्यमांना खडे बोल सुनावले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2019
Total Views |

 

कंगनाला गिल्डने बॅन केल्यानंतर अनेकांनी त्याच्याविरुद्ध निषेध व्यक्त केला. त्याविषयी सोशल मीडियावर तसेच प्रसार माध्यमांमध्ये चर्चांना उधाण आले. मात्र कंगना मात्र याविषयी इतकी शांत कशी काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र आजच तिची बहीण रांगोळी चंदेल हिने आपल्या सोशल मीडियावरून कंगनाची एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये कंगनाने भारतीय प्रसार माध्यमांविषयीचे तिचे मत आणि झालेल्या वादग्रस्त प्रसंगाविषयाची मत व्यक्त केले. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.



 
या देशात प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. त्यामुळे कंगनाचे मत देखील विचारात घेणे हे गरजेचे आहे. मात्र आता या व्हिडीओ नंतर गिल्ड आपला निर्णय मागे घेते की अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहे? त्याचबरोबरीने कंगना याविषयी काय निर्णय घेते हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.  येत्या २६ जुलैला कंगना आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेला 'जजमेंटल है क्या' हा चित्रपट प्रदर्शित होणारे. त्या आधी झालेल्या या वादाचा चित्रपटावर काय परिणाम होईल ही देखील एक महत्वाची बाब आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@