द्युती चंदचा ऐतिहासिक विजय; 'समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी' स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2019
Total Views |


  

नवी दिल्ली : भारताची आघाडीची धावपटू द्युती चंदने इटलीमध्ये सुरु असलेल्या 'वर्ल्ड युनिव्हर्सिटी' स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने ११.२ सेकंदात अंतर पार करत हे सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले असून या जागतिक स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी द्युती चंद ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. द्युतीच्या या अफलातून यशानंतर भारतीयांच्या माना उंचावल्या असून देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 
 

द्युतीनंतर या स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या अँजला डेल पोंटेने ११.३३ सेकंदात १०० मीटर अंतर पार करत रौप्य पदक पटकावले आहे. तर जर्मनीच्या क्वायाईने ११.३९ सेकंदात ब्राँझ पदक पटाकावले. द्युतीच्या या सुवर्णकामगिरीबद्दल तिच्यावर देशभरातून कौतुक होत असले तरी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी द्युतीच्या कामगिरीचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@