कंगना राणावतला गिल्डकडून धक्का

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2019
Total Views |



एंटरटेनमेंट गिल्ड जर्नलिस्ट ऑफ इंडिया या संस्थेने कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या कंगना राणावत ला कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न देण्याचा निर्णय घेतल्याचे नुकतेच जाहीर केले. ७ जुलै ला तिचा आगामी चित्रपट 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान तिच्यात आणि पीटीआय च्या एका पत्रकारामध्ये वाद झाला आणि त्यावेळी तिने त्या पत्रकारावर अनेक तथ्यहीन आरोप केले या कारणामुळे गिल्डने हा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.


दरम्यान या घटनेमुळे 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाविषयी कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही असे आश्वासन देखील गिल्डने दिले. मात्र कंगनाने तिच्या वर्तणुकीविषयी आणि वक्तव्यानविषयी लेखी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली असून गिल्डने 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाची निर्माती एकता कपूर हिला उद्देशून लिहिलेल्या पात्रात नमूद केले आहे.


'जजमेंटल है क्या' या चित्रपटाच्या संगीताच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत कंगनाला पीटीआयच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला, मात्र त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे सोडून तिने त्या पत्रकारावर 'मणिकर्णिका' या तिच्या दिग्दर्शकीय परदारपणाविषयी वाईट लिहिल्याबद्दल ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आणि मग तो वाद इतका चिघळला की अखेर आयोजकांना पत्रकार परिषद स्थगित करावी लागली. आता या सगळ्या प्रकारानंतर कंगना माफी मागते की आपले पालुपद तसेच लावून धरते हे पाहणे महत्वाचे ठरेल.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@