मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आदित्य ठाकरेंची 'जन आशीर्वाद यात्रा’; शुक्रवारपासून यात्रेस सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2019
Total Views |

 

 
 
मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 'जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करणार आहे. येत्या शुक्रवारपासून कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात होईल. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी १ ऑगस्टपासून विकास यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले आहे.
 
 

लोकसभा निवडणुकीत भरभरुन मतदान करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांची मनं जिंकण्यासाठी आदित्य ठाकरे 'जन आशीर्वाद यात्रा' काढणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीने शिवसेनेसाठी ही यात्रा अत्यंत महत्त्वाची असणार आहे. विधानसभेसाठी आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. सोबतच शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा, अशी चर्चा रंगू लागल्याचे आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला महत्त्व प्राप्त झाले आहे. आदित्य संवादयानंतर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जन आशीर्वाद यात्राहे शिवेसेनेचे दुसरे महत्त्वाचे पाऊल आहे.

 
 
 
 
 
 
 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमधून विकास रथयात्राकाढणार आहेत. 'फिर एक बार शिवशाही सरकार' आणि 'अब की बार २२० के पार', या शीर्षकाखाली ही यात्रा निघणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या रथयात्रेला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. परंतु, त्यापूर्वीच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जन संवाद यात्रेला सुरुवात करणार आहेत.

 
 
प्रमुख विरोधी पक्ष अद्यापही थंडच
 
 
येत्या ऑक्टोबर महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात फक्त तीनच महिने शिल्लक असल्याने राज्यात सत्ता परिवर्तन घडविण्यासाठी विरोधी पक्षांनी तयारीला सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. मात्र तयारी करण्यात सत्ताधारी पक्ष भाजपने विकास यात्रा तर शिवसेनेने जन आशीर्वाद यात्रेद्वारे आघाडी घेतली आहे. मात्र राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अद्यापही थंडच असून तयारीच्या दृष्टीने कोणतेही ठोस पाऊले उचलले गेल्याचे चित्र दिसत नाही. कॉंग्रेसमधील राजीनामासत्र आणि अंतर्गत बंडाळी संपता संपेना अशी अवस्था झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकांचे सत्र सुरु असले तरी मात्र ते अद्याप प्रत्यक्ष मैदानात उतरलेले नाहीत.
 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@