पराग कान्हेरे बिग बॉस मराठीच्या घरात जाणार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2019
Total Views |




मुंबई: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आठवड्यामध्ये रंगलेले नॉमिनेशन टास्क आणि टिकेल तोच टिकेल या कार्या दरम्यान सदस्यांमध्ये बरेच वाद विवाद, भांडण, आरोप प्रत्यारोप झालेआणि टिकेल तोच टिकेल या कार्यादरम्यान नेहा आणि पराग मध्ये झालेल्या वादामुळे पराग कान्हेरेला बिग बॉस यांनी घरामधून निलंबित केलेपरंतु कालच्या भागामध्ये महेश मांजरेकरांनी त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, सदस्यांनी टास्क दरम्यान झालेल्या सगळ्याच गोष्टी पुन्हाएकदा सांगितल्या, परागने त्याची बाजू मांडलीमहेश मांजरेकरांनी पराग ज्याप्रकारे नेहाशी वागला त्याचा जाब विचारला आणि त्याला कठोर शब्दांमध्ये खडसावले. आजच्या भागामध्ये तो पुन्हा एकदा घरात एन्ट्री घेणार आहे. महेश मांजरेकर यांनी Weekend चा डावमध्ये परागला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री घ्यायला सांगतली आहेघरातील सदस्यांची यावर काय प्रतिक्रिया असेल ? ते परागला माफी देतील ? पुढे काय होईल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

याचसोबत बिग बॉसच्या घरामध्ये सदस्यांची कोण ठेवत आहे मसालेदार नावं ? याच संदर्भातील चुगली हीनाच्या चाहत्याने तिला आज केली आहे... ज्यामध्ये हीनाला वीणाने हिंग असे म्हंटले आहे जे बेचव असतेयावर वीणाचे म्हणणे आहे ही नावं मी ठेवली नसून परागने ठेवली आहेत, ज्यामध्ये किशोरी ताई केशर, वीणा बदाम, रुपाली इलायची आहे

महेश मांजरेकरांनी शिवला एक गमतेशीर प्रश्न विचारला जर हीना घरामध्ये आधीपासून असती आणि वीणा वाईल्ड कार्ड म्हणून आली असती तर ? याचे शिव काय उत्तर देईल हे आजच्या भागामध्ये बघूयायाचसोबत किशोरी शहाणे यांना देखील प्रश्न विचारला जर अभिजीत केळकर या घरामध्ये आलाच नसता तर ? या प्रश्नाचे त्या काय उत्तर देतात बघूया आजच्या भागामध्येतेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन - WEEKEND चा डाव आज रात्री .३० वा.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@