‘मोगरा फुलला’ चित्रपटाने केली ४ करोड १७ लाख इतकी कमाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2019
Total Views |



आई-मुलाचे, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणारा, एक कौटुंबिक संदेश देणारा आणि स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला श्राबणी देवधर दिग्दर्शित 'मोगरा फुलला' हा चित्रपट १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि हा सिनेमा थोड्या दिवसातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने एकुण कोटी ४५ लाखांचा गल्ला जमवला होता. चित्रपटाने दुसऱ्या आठवडयातदेखील आपली घौडदौड कायम ठेवत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. १७ जून ते २३ जून या दुसऱ्या आठवड्यात एकूण कोटी ७२ लाख इतकी कमाई केली आहे.‘मोगरा फुललासिनेमाला एकूण मिळणारा प्रतिसाद बघता सिटी प्राईड चेन, ठाणे आणि मुंबई येथील थियटरमधील चित्रपटाच्या शोची संख्या वाढविण्यात आली आहे. आणि यामुळेच सिनेमालादेखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असूनमोगरा फुललाया सिनेमाची दोन आठवड्यांची एकूण कमाई करोड १७ लाख इतकी झाली आहे.

 

नाजूक नात्यांचा गुंफलेला गजराया टॅगलाईनसह प्रदर्शित झालेला मोगरा फुललाचित्रपटात स्वप्नील जोशी, सई देवधर, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी,आनंद इंगळे, संदीप पाठक आदींच्या दमदार अभिनयाने नटला आहे.नीना कुळकर्णी यांच्या रूपाने बऱ्याच काळाने पडद्यावर एक हृदयाला भिडणारी आई रसिकांना पाहायला मिळते, तर दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रकांत कुलकर्णी स्वप्नीलच्या काकाच्या भूमिकेत वेगळी छाप पाडून जातात. अशा अनेक हळुवार नात्यांची पैशांनी श्रीमंत होणं सोप्पं, नात्यांनी समृद्ध होणं कठीणया टॅगलाइनमधील गुंफण प्रत्यक्ष पडद्यावर अनुभवता येते.


चित्रपटातील गाणी अभिषेक कणखर यांनी लिहिली असून रोहित राऊतने संगीत दिले आहे.शंकर महादेवन, बेला शेंडे, जसराज जोशी यांच्या आवाजातील गाणी उत्तम जुळून आली आहेत.उत्तम कथा, कलाकारांचा दमदार अभिनय, चांगली संकल्पना आणि सुमधुर संगीत यांच्यामुळे मोगरा फुललाहा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील यात काही शंका नाही.




 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
@@AUTHORINFO_V1@@