पंतप्रधान मोदींचा श्रीलंका दौरा : स्फोटातील मृतांना वाहिली श्रद्धांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्याला सुरुवात केली असून त्यांनी प्रथम मालदीवला भेट दिली. त्यानंतर रविवारी श्रीलंकेला भेट दिली. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीलंकेतील इस्टर दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. श्रीलंकेत झालेल्या हल्ल्यात २५० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात ११ भारतीयांचा समावेश होता.

 

नरेंद्र मोदी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या द्विपक्षीय चर्चेत ते दहशतवादाविषयी मुद्दांवरही चर्चा करणार आहेत. मोदींनी राष्ट्रपती भवनमध्ये वृक्षारोपणही केले. तसेच श्रीलंकेतील हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. मालदीव आणि श्रीलंका या दोन देशांचा दौरा हा भारतासाठी 'नेबरहूड फर्स्ट' ही नीती महत्वपूर्ण असल्याचे दर्शवत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी या पूर्वीच म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यालाही अनेक देशांच्या प्रमुखांना बोलावले होते. या देशांमध्ये श्रीलंका आणि मालदीवचाही सामावेश होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@