अभिमास्पद; भारत अंतराळात करणार युद्धाभ्यास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत भारताने आता पहिल्यांदाच अंतराळात युद्धाभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, अंतराळात चीनला टक्कर देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेला अधिक मजबूत करण्यासाठी भारताने यंदाच्या मार्च महिन्यात उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. सोबतच ट्राय सर्व्हिस डिफेन्स स्पेस एजन्सीचीही सुरुवात केली होती. तद्नंतर आता पुढच्या महिन्यात पहिल्यांदाच अंतराळ युद्धाभ्यास करण्यात येणार असून त्याचे नामकरण इंडस्पेसएक्स (IndSpaceEx) असे करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर युद्धाभ्यास एका टेबल-टॉप-वॉर-गेमवर आधारित असेल, ज्यात लष्करासह शास्त्रज्ञही सहभाग घेतील. दरम्यान, भारत चीनसारख्या देशांकडून आपल्या अंतराळ संपत्तीवरील संभावित धोक्याचा सामना करण्यासाठीच्या आवश्यकतेप्रति किती गंभीर आहे, हेही यातून दिसते.

 

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आताच्या युद्धाभ्यासाबद्दल सांगितले की, अंतराळाचे लष्करीकरण होत आहे आणि स्पर्धाही वाढत आहे. संरक्षण मंत्रालयाने जुलैच्या अंतिम आठवड्यात आयोजित केलेल्या युद्धाभ्यासाचा उद्देश अंतराळ सुरक्षा व आपल्या काऊंटर-स्पेस क्षमतांचे आकलन करणे हा आहे आणि यातून आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचेही आकलन होणार आहे. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारताला सध्या अंतराळात विरोधी शक्तींचे निरीक्षण-निगराणी, संचार-दळणवळण, पूर्वसूचना-इशारा आणि लक्ष्य निश्चितीकरणासारख्या गोष्टींची आवश्यकता आहे. ज्यामुळे आपल्या सशस्त्र बलांची विश्वसनीयता वाढेल आणि राष्ट्रीय सुरक्षाही मजबूत होईल. अशा परिस्थितीत होत असलेल्या इंडस्पेसएक्सद्वारे अंतराळातील आव्हानांना उत्तमप्रकारे समजून घेण्यात मदत होईल.

 

दरम्यान, संरक्षण तज्ज्ञांच्या मते, भारताने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अण्वस्त्रयुग सुरु झाल्यापासून अंतराळच ही अशी जागा राहिली की, जिथे प्रत्येक देश आपली लष्करी ताकद वाढवत आहे. आपण यात चीनपेक्षा मागे असलो तरी, चीनला पछाडण्यातही आपण सक्षम आहोत. दुसरीकडे संरक्षण आणि अन्य महत्त्वाच्या क्षेत्राशी निगडित संकेतस्थळे नेहमीच हॅक होताना दिसतात, त्यांच्यासाठीही हा युद्धाभ्यास एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे.

 

भारताचे मिशन शक्ती परिक्षण

 

भारताने मिशन शक्ती अंतर्गत एक विश्वसनीय काऊंटर-स्पेस क्षमता विकसित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले. भारताने याद्वारे कमी वजनाच्या आणि पृथ्वीच्या कक्षेत २८३ किमी उंचीवरील ७४० किलो वजनाचा उपग्रह नष्ट करण्यासाठी १९ टन वजनाचे इंटरसेप्टर मिसाईल प्रक्षेपित केले होते. भारताने हे परिक्षण यंदा २७ मार्च रोजी केले. दरम्यान, चीनने जानेवारी २००७मध्ये एका हवामानविषयक उपग्रहाला क्षेपणास्त्राने नष्ट करण्याचे परिक्षम केल्यानंतर दोन्ही गतिज आणि गैर गतिजरुपात अंतराळातील लष्करी क्षमतांचा विकास केला. दुसऱ्या बाजूला चीनने अंतराळात अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या आपल्या महत्त्वाकांक्षी-समुद्रात एकाच नौकेतून ७ उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमाचे तीन दिवसांआधीच परिक्षण केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@