'भारत' ठरला २०१९ चा बिगेस्ट हिट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2019
Total Views |



अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत हा चित्रपट ५ जून ला म्हणजेच ईदीच्या दिवशी प्रदर्शित झाला. सलमान खान आणि कतरीना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या भारत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड पार करत तीन दिवसातच ९५ कोटींचा पल्ला गाठला. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली.

 

या भरघोस प्रतिसादासह भारत हा चित्रपट २०१९ मधील बिगेस्ट हिट चित्रपट ठरला आहे. सलमान खानच्या एक था टायगर आणि सुलतान या चित्रपटना देखील मागे टाकत 'भारत' या चित्रपटाने सरशी केली आहे. तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गली बॉय, कलंक, टोटल धमाल या चित्रपटांना देखील या चित्रपटाने शाह दिला आहे.

 

'भारत' ची पहिल्याच दिवसाची कमाई ४२.३० कोटी झाल्यावर या चित्रपटाच्या कामाईबद्दलच्या अपेक्षा निश्चितच वाढल्या होत्या मात्र दुसऱ्या दिवशी ३१ कोटी आणि तिसऱ्या दिवशी २२. २० कोटींची कमाई करत चित्रपटाने सर्वांना अचंबित केले. त्यामुळे या कमाईसह आता हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये तर पोहोचलाच आहे मात्र एक नवीन विक्रम या चित्रपटाने रचल्याचे दिसून येत आहे. आता आगामी चित्रपटांमध्ये कोणता चित्रपट या कमाईवर मात करेल हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@