धोनीच्या देशप्रेमाचे देशभरातून स्वागत; आयसीसीला मात्र खुपलं

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2019
Total Views |


 


मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवत यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील आपल्या अभियानाची धडाकेबाज सुरुवात केली. मात्र या विजयापेक्षा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोव्हजवरील भारतीय लष्कराच्या 'बलिदान' चिन्हाचीच चर्चा जास्त रंगली. धोनीच्या या ग्लोव्हजवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) समोरासमोर उभे ठाकले आहेत. तर धोनीच्या समर्थकांनी धोनीची बाजू लावूं धरत 'बलिदान चिन्ह' असलेलेच ग्लोव्हज वापरायचा सल्ला दिला आहे.

 

काय आहे प्रकरण

 

साऊथॅम्पटन येथे झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील सामन्यात धोनीने आफ्रिकेच्या फेलुक्वायोला यष्टिचित केले. त्याच वेळी धोनीच्या ग्लोव्हजवरील एक चित्र कॅमेरात टिपले गेले. हे चित्र काय आहे याची सर्वांना उत्सुकता लागून होती. अखेर शोध लागला आणि धोनीच्या या कृतीने संपूर्ण भारतवासीयांचा उर अभिमानाने भरून आला. कारण धोनीने पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडे असलेले विशेष बलिदानचिन्ह आपल्या ग्लोव्ह्ज वापरले होते. त्याच्या त्या ग्लोव्हजचे फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल होत नेटकऱ्यांनी धोनीच्या या कृतीचे कौतुक केले. मात्र, आयसीसीचे रणनिती समन्वयक क्लेअर फर्लोंग यांनी ग्लोव्हजवरील 'बलिदान बॅज'वर आक्षेप घेत, बीसीसीआयला ते मानचिन्ह हटवण्याचे आवाहन केले. आयसीसीने धोनीच्या ग्लोव्हजवर आक्षेप घेतल्यानंतर बीसीसीआय धोनीच्या समर्थनार्थ उतरला आहे. बीसीसीआयने यासंदर्भात आयसीसीकडे परवानगी मागितली असून प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर याबाबत माहिती देऊ, असे बीसीसीआयचे प्रशासक विनोद राय यांनी सांगितले.

 

देशवासियांचं समर्थन

 

आयसीसीच्या या मागणीनंतर भारतीय क्रिकेटप्रेमी चांगलेच संतापले असून धोनीच्या समर्थनार्थ ट्विटरवर #DhoniKeepTheGlove ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये भारतीयच नव्हे तर जगभरातील धोनीच्या चाहत्यांनी धोनीला पाठिंबा दर्शवला आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांनीदेखील आयसीसी कानउघाडणी केली आहे. मैदानात पाकिस्तानी संघाचा नमाज चालतो मग धोनीने बलिदानचिन्ह असलेले ग्लोव्हज घातल्यास त्यात चुकीचे काय? असा सवाल तारेक फतेह यांनी उपस्थित केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@