पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतरचा पहिला
भारताबाहेरील दौरा निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका आणि
मालदीव येथे दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना होणार आहेत.
मालदीवमधील भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेला भेट देतील. श्रीलंकेमध्ये नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेनंतर ऐक्याचे प्रतीक दर्शवण्यासाठी ही भेट घेतली जाईल. श्रीलंकेबरोबर, त्यांच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी तसेच राजनैतिक हितसंबंध वाढवण्याच्या दृष्टीने ही भेट महत्वाची ठरणार आहे. त्यानंतर कोलंबोला भेट देण्यात येईल. नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोलंबोला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले आतंरराष्ट्रीय नेतृत्व आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat