देशातील उष्णतेच्या पातळीत प्रचंड वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2019
Total Views |



गेल्या कित्येक दिवसात हळूहळू देशातील उष्णतेच्या पातळीत वाढ होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत तर उष्णतेचा पारा खाली येण्याचे नावच घेत नाहीये अशातच देशातील अन्य महत्वाच्या भागांमध्ये काल तापमानाने ४२ अंशांची पातळी ओलांडली.
 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ओडिशातील पश्चिम भागात काल प्रचंड प्रमाणात उष्णतेची लाट काल दिसून आली. तर झारसुगुडा या ठिकाणी राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमान ४५.२ डिग्री तर किमान तापमान ४० डिग्री इतके नोंदवले गेले.

महाराष्ट्रातील ब्रम्हपुरी येथे उष्णतेचा पारा ४७.५ अंश सेल्सियस नोंदवण्यात आला तर त्या खालोखाल नागपूरमध्ये ४७.२ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.

पंजाब आणि हरियाणामध्ये देखील उष्णतेने उच्चांक गाठला असून दोन्ही ठिकाणी साधारण ४५ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले आहे तर लुधियानामध्ये ४४.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्याचबरोबर पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये पावसाच्या काही सरी पडण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@