पुन्हा एकदा पवारांकडून संघाचे कौतुक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2019
Total Views |


 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा रा.स्व.संघाच्या कामाची स्तुती केली आहे. "जनसंपर्क कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिकायला हवे. त्यांच्यासारखी चिकाटी हवी." असा सल्ला पवारांनी त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गुरुवारी दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने गुरुवारपासून विभागनिहाय बैठकांना सुरुवात केली आहे.

 

पुण्यातील भोसरी मतदारसंघातून या विभागनिहाय बैठकीची सुरुवात झाली. यावेळेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार यांनी रा.स्व संघ स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक केले. त्यावेळेस त्यांनी एका खासदाराने सांगितलेला किस्सा कार्यकर्त्यांना सांगितला. ते म्हणाले की," रा.स्व.संघाचे सदस्य कसा प्रचार करतात हे लक्षात घ्यायला हवे. ते पाच घरांमध्ये भेटायला गेले आणि त्यातले एखादे घर बंद असले तर ते संध्याकाळी जातात. संध्याकाळी बंद असेल तर सकाळी जातात, पण त्या घरी जाऊनच येतात. हे त्यांच्याकडून शिकायला हवे."

 

यापूर्वीदेखील शरद पवारांनी रा,स्व,संघाचे कौतुक केले आहे. वाचा काय म्हणाले होते,

 
 

"लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच घरोघरी जाऊन भेटायला हवे. आतापासून भेटत राहिलात तर ऐनवेळी आठवण आली का? असा प्रश्न निवडणुकीच्या वेळी मतदार विचारणार नाहीत." असे पवारांनी सांगितले. शिवाय त्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचेदेखील आश्वासन दिले.


 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@