‘मिस यू मिस्टर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; सिद्धार्थ आणि मृण्मयी पुन्हा एकत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2019
Total Views |




मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अग्निहोत्र या मालिकेमध्ये या दोघांच्या जोडीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला.

 

या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि संगीत अनावरण सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला. या प्रसंगी सिनेमाचे संगीत दिग्दर्शक आलाप देसाई, आनंदी जोशी यांच्या गाण्याने देखील सोहळ्यात बहार आली. सिद्धार्थ आणि मृण्मयीशिवाय मराठीमधील अनेक दिग्गज कलालकरांचा या चित्रपटात समावेश आहे. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे.

 
 
 

चित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली, “मिस यू मिस्टर'मध्ये मी 'कावेरी' नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते.

 

‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाबद्दल बोलताना सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, “मृण्मयीबरोबर काम करताना खूप मजा आली. या चित्रपटामध्ये मी ‘वरूण' नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केले असून त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे.

 

‘मिस यू मिस्टर’ २८ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील गीते वैभव जोशी यांनी लिहिली आहेत असून दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली असून थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@