पवारांना पाचव्या नाही पहिल्याच रांगेत स्थान : राष्ट्रपती भवन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2019
Total Views |


 

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एनडीएने लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांना धूळ चारली. त्यानंतर शपथविधी कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांना पाचव्या रांगेतील पास दिल्याने मानापमानाचे नाट्य घडले होते. परंतु, त्यांना पाचव्या नाही तर पहिल्या रांगेत स्थान होते, असे स्पष्टीकरण राष्ट्रपती भवनामधून दिले आहे.

 

"शरद पवारांना व्हीव्हीआयपी सेक्शनमध्ये पहिल्याच रांगेत जागा देण्यात आली होती. ३० मे रोजी झालेल्या या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांना व्ही सेक्शनमध्ये बसण्याचे निमंत्रण देण्यात आले होते जिथे सर्वात वरिष्ठ नेत्यांसाठी जागा राखीव असते. त्यामुळे पवारांच्या पासवरील व्ही हे लेबल पहिल्याच रांगेसाठी देण्यात आले होते. मात्र, पवारांच्या कार्यालयाचा या व्ही लेबलवरुन गोंधळ झाला असावा आणि त्याला ते पाचवी रांग समजले असावेत." असे ट्विट राष्ट्रपती भवनाचे माध्यम सचिव अशोक मलिक यांनी केले.

 
 
 

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी दरम्यान शरद पवारांना पाचव्या रांगेत स्थान दिल्याबद्दल शरद पवारांनी नाराजी व्यक्त करून अनुपस्थिती दर्शवली होती. याबाबत माध्यमामध्ये झालेली चर्चा आणि राष्ट्रपती भावनाकडे आलेल्या तक्रारीनंतर अशोक मलिक यांनी हे ट्विटकरून स्पष्टीकरण दिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@