बिग बॉस मराठी सिझन २ - दिवस नववा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2019
Total Views |


 

सगळे सदस्य होणार का नॉमिनेट ?

कोणावर चिडले अभिजीत बिचुकले?

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात पोपटाचा पिंजरा हा टास्क सुरु आहे. ज्यावरून घरामध्ये काल बरेच वाद देखील झाले. मैथिली नेहावर काल खूप चिडली कारण, नेहाने दिलेले कारण मैथिलीला अजिबात पटले नाही. मैथिलीने नेहाला कॅप्टनसी मिळावी म्हणून वोट दिले होते, जेंव्हा हे मैथिलीने नेहाला सांगितले तेंव्हा नेहा म्हणाली मला कुणावरही विश्वास नाही. नेहाच्या या वक्तव्यावर मैथिलीने नाराजगी व्यक्त केली. काल या टास्क मध्ये पराग, वीणा, माधव हे नॉमिनेट झाले. आज या टास्क वरूनच बिग बॉसने हे जाहीर केले कि, जर सदस्यांनी कुणाला नॉमिनेट केलं नाही तर बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट करतील. आता काय पुढे काय होईल?  सर्व सदस्य नॉमिनेट होतील ? हे आज कळेलच.

इतकेच नसू शिवानी, शिव आणि दिंगबर यांनी मिळून बिचुकले यांची थोडीशी गंमत करण्याचे ठरवले. अभिजीत बिचुकले बाथरूम मध्ये असताना त्यांनी लाईटचा खेळ केला त्यामुळे ते खुप वैतागले. पण यानंतर त्यांचा राग अजूनच वाढला. कारण, कालच्या पोपटचा पिंजरा या टास्क मध्ये बिचुकलेनी परागला नॉमिनेट केले आणि त्यामुळे पराग त्यांना वारंवार चिडवताना दिसणार आहे कि, “साताऱ्यामध्ये परतीचे पेढे तयार ठेवाआता या वाक्यामुळे अभिजीत बिचुकले यांना राग अनावर झाला आणि त्यांनी पराग यांना खडसावले या घरात कोण जाणार कोण जाणार ते तुम्ही नका ठरवू. आता या भांडणाच पुढे काय होईल ? बघा आजच्या भागामध्ये.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@