सरकारने राम मंदिर उभारण्यास सुरुवात करावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2019
Total Views |




डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली मागणी


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील रामजन्मभूमीवर राम मंदिराची लवकरात लवकर उभारणी करण्याची मागणी भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. डॉ. स्वामी यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहून ही मागणी केली. त्यांनी या पत्रात राम मंदिराच्या जमीन अधिग्रहणासाठी सरकारला न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचा उल्लेख केला. यासाठी त्यांनी नरसिंह राव सरकारच्या १९९३ च्या निर्णयाचा हवाला दिला.

 

डॉ. स्वामी यांनी या पत्रात म्हणाले, सरकारने १९९३ साली वादग्रस्त आणि वादग्रस्त नाही, अशा दोन्ही प्रकारच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या. १९९४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ही कृती वैध ठरविली होती. त्यानंतर रामजन्मभूमी न्यासासह सर्व पक्षकारांनी हा निर्णय मान्य केला. माझ्या माहितीनुसार सरकारला याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयासह कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही." यामुळे सरकारने वेळ न दवडता अधिकाराचा वापर करुन वादग्रस्त नसलेल्या जमिनीवर ताबडतोब मंदिर उभारणीस सुरुवात करावी, असे डॉ. स्वामी म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@