...आणि टीम इंडियावर चढला भगवा रंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2019
Total Views |



मुंबई : आयसीसी विश्वचषक २०१९ला धमाक्यात सुरुवात झाली आहे. अशामध्ये भारताकडून नव्या जर्सीची माहिती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाची निळ्या रंगाची जर्सी तर आहेच, तसेच आता भारतीय संघ हा भगव्या रंगाची जर्सीदेखील परिधान करणार आहे. विश्वचषकामध्ये यंदा १० संघांचा समावेश आहे. त्यामध्ये बहुतेक संघांच्या जर्सीचे रंग सारखेच आहेत. त्यामुळे काही संघांना दोन जर्सी डोळ्या आहेत, म्हणजे त्याने सामना पाहताना प्रेक्षकांचा गोंधळ उडणार नाही.

 

आयसीसी विश्वचषक २०१९ मध्ये भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध खेळणार आहे तेव्हा दोन्ही संघाच्या जर्सीमध्ये समानता दिसेल, त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्यांच्या नेहमीच्या जर्सीऐवजी नव्या भगव्या जर्सीचा वापर करावा लागेल. भारतीय संघाची ही नवी जर्सी मागच्या बाजूने भगवी आहे. ३० जूनला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये भारतीय खेळाडू ही जर्सी घालतील.

 

भारतीय संघाचा पहिला सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ जूनला होणार आहे. रविवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामान्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने वेगळी जर्सी वापरली. दक्षिण आफ्रिकेने आपली नेहमीचीच जर्सी वापरली असती, तर त्यांच्या आणि बांगलादेशच्या जर्सीचा रंग सारखाच हिरवा दिसला असता. म्हणून आयसीसीने ही शक्कल लढवली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@