२०२२ पर्यंत नव भारत निर्माण करण्यासाठी काम करणार - राव इंद्रजित सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : केंद्रीय नियोजन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून राव इंद्रजित सिंह यांनी आज पदभार स्वीकारला. २०२२ पर्यंत नव भारताची निर्मिती करण्यासाठी काम करण्यावर आपला भर राहील. सर्वसमावेशी आणि सर्वांगीण विकासाला आपले प्राधान्य राहील असे ते म्हणाले. नीति आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी एक बैठक घेऊन या आधीच्या कार्याचा आढावा घेतला.

११ फेब्रुवारी १९५० मध्ये हरियाणातल्या रेवाडी येथे जन्मलेले राव इंद्रजित सिंह नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गुरुग्राम मतदारसंघातून निवडून आले आहेत. दिल्ली विद्यापीठाची एलएलबी पदवी प्राप्‍त केलेले राव इंद्रजित सिंह यांनी हिंदू कॉलेजमधून बी.ए पदवी घेतली आहे.

५ जुलै २०१६ ते ३ सप्टेंबर २०१७ या काळात नियोजन (स्वतंत्र कार्यभार), नागरी विकास, गृहनिर्माण आणि नागरी दारिद्रय निर्मूलन या विभागांचे राज्यमंत्री म्हणून काम केले. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ या काळात नियोजन विभागाचा स्वतंत्र कार्यभार तर संरक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. राव इंद्रजित सिंह पाचव्यांदा खासदार झाले आहेत. हरियाणा विधानसभेत आमदार म्हणूनही ते चार वेळा निवडून आले आहेत.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@