धक्कादायक : आसाममध्ये लढाऊ विमान बेपत्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारतीय वायू दलाचे एएन-३२ हे विमान उड्डाणांनंतर अचानक बेपत्ता झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. यामध्ये ८ क्रू मेंबर आणि ५ प्रवाशांसह एकूण १३ जणांचा समावेश आहे. जोरहाट इथून या विमानाने दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण केले. मेंचुका अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंडवर या विमानाचे लँडिंग होणे अपेक्षित होते. पण उड्डाणानंतर अर्ध्या तासात या विमानाचा जमिनीशी संपर्क तुटला. भारतीय वायू दलाने शोध मोहीम सुरु केली असून अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही.

 

सुखोई ३० आणि सी - १३० ही खास लढाऊ विमाने या गायब झालेल्या विमानाचा शोध घेत आहेत. भारतीय वायूदल बेपत्ता झालेल्या विमानातल्या १३ जणांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. दोन वर्षांपूर्वी असेच वायू दलाचे विमान बेपत्ता झाले होते. ही दुर्घटना २२ जुलै २०१६ रोजी घडली होती. चेन्नईतून उड्डाण केलेले हे विमान ३२ प्रवाशांसह अचानक बेपत्ता झाले होते. अंदमानातल्या पोर्ट ब्लेअरकडे निघालेले असतानाच हे विमान रडारवरून अचानक नाहीसे झाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@