सावधान; मोदींच्या नावाचा वापर करून फसवणुकीचा ट्रेंड!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2019
Total Views |




नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर करून तरुणांना फसवणाऱ्या एका वेबसाईटचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पंतप्रधान मोदींच्या नावाने मोफत लॅपटॉप वाटले जात असल्याचे या वेबसाईटवर सांगितले गेले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २३ वर्षाच्या राकेश जांगीड या तरुणाला अटक केली आहे.

 

फेक वेबसाइट तयार करून लोकांची गोपनीय माहिती चोरायची आणि त्यातून त्यांना गंडा घालायचा असा या तरुणाचा उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले. २३ वर्षांचा राकेश जांगीड राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील पुंडलोटाचा रहिवासी असून धक्कादायक बाब म्हणजे, राकेशने नुकतीच आयआयटी दिल्ली येथून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

 

मोदी सरकारने दुसऱ्यांदा सत्ता मिळवल्याने मोफत लॅपटॉप वाटले जात असलायचा मेसेज राकेशने सोशल मिडियावर व्हायरल केला होता. यासाठी www.modi-laptop.wishguruji.com या संकेतस्थळावर नावनोंदणी सुरु असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले होते. यावर विश्वास ठेवत तब्बल १५ लाख लोकांनी नावनोंदणी केली.

 

राकेशने नावनोंदणी दरम्यान आधार कार्ड, बँक खाते अशा अनेक गोपनीय गोष्टींची माहिती विचारली होती. याच माहितीच्या आधारे या लोकांना गंडवण्याचा आपला प्लॅन असल्याचे त्याने मान्य केले आहे. दरम्यान, अशा फेक वेबसाईटपासून नागरिकांनी सावध राहण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@