मेट्रो प्रवाशांकरिता पेटीएमची ' मेट्रो रूट सर्च' सेवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2019
Total Views |



मुंबई : 'पेटीएम'द्वारे आता 'मेट्रो रूट सर्च' सेवा सुरू केली आहे. या सेवांचा फायदा मेट्रो रेल प्रवाशांना आपल्या प्रवासाच्या आखणीसाठी करता येईल. ही सुविधा मुंबईसह दिल्ली, नोयडा, गुडगाव, बंगळूर, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई, लखनऊ, कोची आणि जयपूर अशा मेट्रो रेल सुविधा असलेल्या सर्व १० शहरांमध्ये उपलब्ध आहे.

 

ही सुविधा तुमचे निघण्याचे स्थान आणि गंतव्य स्थान यासाठीचा मार्ग तर सुचवतेच शिवाय प्रवासासाठी लागणारा अंदाजित वेळ, भाडे, मध्ये येणारी स्टेशन्स आणि लाइन बदलण्यासाठीची स्टेशन्स ही माहिती देखील देते. जेव्हा एकाहून जास्त रस्ते संभव असतील, त्यावेळी सर्वात उत्तम मार्ग कोणता ते सुचवते ज्यामागे, प्रवासाला लागणारा वेळ आणि प्रवासादरम्यान बदलाव्या लागणा-या मेट्रो लाइन्सची संख्या यांचा विचार असतो.

 

पेटीएमचे उपाध्यक्ष अभिषेक राजन म्हणाले, “पेटीएममध्ये आम्ही सतत आमच्या वापरकर्त्यांचा प्रवास अधिक सुखद कसा करता येईल याचा विचार करत असतो. आपल्या प्रवासाचे कुशल आयोजन करण्यासाठी प्रवाशांना आम्ही या रुपानं आणखी एक सोयिस्कर साधन ऑफर करत आहोत. अॅपवर हे फीचर सक्रिय केल्यानंतर काही तासांतच त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे आम्हाला दिसून आले आहे. आमच्याकडे सर्व प्रकारच्या प्रवसांसाठी अशी इतर अनेक नावीन्यपूर्ण फीचर्स विचाराधीन आहेत, जी आमच्या यूझर्सचा प्रवासाचा अनुभव अधिक सुधारतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@