सावधान : आता पोलिसाची पाटी लावणे पडणार महागात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2019
Total Views |



मुंबई : मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी वाहनांवर 'पोलीस' अशी पाटी लावता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यापुढे अशा वाहनांवर कारवाई केली जाईल असेही सांगितले आहे. वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि सामान्यांप्रमाणे त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०१३च्या कलम १३४ प्रमाणे यावर कारवाई करण्यात येणार आहे.

 

अनेकदा पोलिसांच्या खासगी वाहनांवर 'पोलीस' अशी पाटी किंवा लोगो लावण्यात येतो. याचा वापर करून काही जणांकडून नियमांची पायमल्ली केली जाते. असे प्रकार रोखण्यासाठी न्यायालयाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर वाहतूक पोलिसांना येत्या ७ दिवसात कुणावर कारवाई केली याचा अहवाल वाहतूक मुख्यालयाला सादर करायचा आहे. त्यामुळे येत्या काही काळात अशी कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस सक्रिय झाल्याचे पाहायला मिळेल. तसेच, न्यायाधीशांनाही आपल्या खासगी वाहनांवर 'न्यायाधीश' असे लिहिता येणार नाही. याबाबत मुंबई उच्चं न्यायालयाने परिपत्रक काढले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@