भुवी कि शमी ? भारतासमोर मोठा प्रश्न...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : विश्वचषक २०१९ आत अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. भारताला सुरुवातीपासूनच दुखापतीने सावट असले तरी भारताने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीतून सावरला आहे. त्याने विश्वचषकात पुनरागमन करण्याच्या दृष्टीने इनडोअर नेट्समध्ये गोलंदाजीचा सरावही सुरु केला आहे. यामध्ये ट्विस्ट म्हणजे आता विराट कोहलीसमोर अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेणारा मोहम्मद शमी की भुवी? असा मोठा प्रश्न उभा राहणार आहे.

 

भुवनेश्वरने आतापर्यंत विश्वचषकामध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने ३ सामन्यांमध्ये ४.५च्या इकॉनॉमी रेटने ५ विकेट घेतल्या आहेत. परंतु, पाकिस्तानविरुद्ध मॅन्चेस्टरच्या सामन्यात गोलंदाजी करताना भुवनेश्वरच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले होते. त्यानंतर त्याला आठ दिवस गोलंदाजी करण्यास डॉक्टरांनी मनाई केली होती. परंतु, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद, गगन खोडा आणि जतिन परांजपे यांच्या निरीक्षणाखाली त्याने नेट्समध्ये सराव केला. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यामध्ये त्याचे पुनर्रागमन होण्याची शक्यता आहे.

 

तसेच, मोहम्मद शमी याने अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये हॅट्ट्रिक घेतल्यानंतर तोही चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीसमोर भुवी की शमी हा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामध्ये अजूनही भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटला नाही. विजय शंकर फेल ठरल्यानंतर आता केदार जाधवचा विचार केला जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@