आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राची भरीव कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2019
Total Views |



निती आयोगाच्या आकडेवारीत राज्य तिसऱ्या स्थानावर



नवी दिल्ली : केंद्र सरकारचा थिंक टॅंक मानला जाणाऱ्या निती आयोगातर्फे राज्यनिहाय्य आकडेवारी जाहीर केली आहे. निती आयोगातर्फे सर्व राज्यांच्या आरोग्यविषयक परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यात महाराष्ट्राचा पहिल्या तीन राज्यांमध्ये क्रमांक लागतो, तर केरळ सर्वात अग्रक्रमी आहे तर, उत्तर प्रदेश सर्वात शेवटी आहे. २०१८ मध्ये जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतरी केरळ राज्याने बाजी मारली होती. मात्र, महाराष्ट्राने २०१५-१६ च्या तुलनेत सहाव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. 



 

.

नीति आयोग आणि आरोग्य मंत्रालयाने एकत्र येत २३ विविध मुद्दे लक्षात घेत ही आकडेवारी जारी केली होती. त्या आधारे राज्यनिहाय्य आकडेवारी जारी करण्यात आली आहे. नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी ही माहीती जाहीर करत म्हटले की, लहान राज्यांच्या आकडेवारीचा तक्ता सुधारताना दिसत आहे.


 

 

मोठ्या राज्यांमध्ये हरियाणा, राजस्थान आणि झारखंड या राज्यांचा आलेख गेल्या वर्षाच्या तुलनेत सुधारला आहे. लहान राज्यांमध्ये सर्वात पुढे मिझोरामचा क्रमांक लागतो. त्रिपूरा आणि मणिपूर या राज्यांनीही आरोग्य क्षेत्रात समाधानकारक प्रगती केली आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता, गतवर्षीच्या तुलनेत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. २०१५-१६ मध्ये महाराष्ट्र ६१.०७ गुणांसह सहाव्या स्थानावर होता. तर, २०१६-१७ मध्ये ६८.९९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@