‘गीत रामायणा’ची हिंदी आवृत्ती निघणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2019
Total Views |


 


केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला निर्णय


नवी दिल्ली : गीत रामायणची हिंदी आवृत्ती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची घोषणा माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात आली. गीत रामायणाची दत्त प्रसाद जोगकृत हिंदी पुस्तक आवृत्ती प्रकाशन विभाग प्रसिद्ध करणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतचा निर्णय घेतला. यासंदर्भात आयुष मंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांना यासंदर्भात जावडेकर यांनी पत्र लिहून कळवले आहे.

 

गीत रामायण हे मराठी भाषेतील ५६ गाण्यांचे संग्रह आहे. ही गाणी रामायणच्या वेगवेगळ्या भागाचे वर्णन करणारी आहेत. ग.दि.माडगूळकर लिखित आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीतरामायणाने देशात इतिहास घडवला होता. १९५५-५६ या वर्षात पुणे आकाशवाणी वरुन गीतरामायणाचे प्रसारण करण्यात आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@