देशाबाहेर ३४ लाख कोटींची अघोषित संपत्ती !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2019
Total Views |




नवी दिल्ली : १९९८ ते २०१० दरम्यान भारतीयांनी देशाबाहेरील १५ ते ३४ लाख कोटींची अघोषित संपत्ती असल्याचा अहवाल नुकताच प्रदर्शित झाला आहे. एनआयपीएफपी, एनसीएईआर आणि एनआयएफएम या प्रतिष्ठीत संस्थांनी ही माहीती उघडकीस आणली आहे. संसदेत या संदर्भात एक अहवालही सादर करण्यात आला. त्यानुसार, बांधकाम क्षेत्र, खनिज क्षेत्र, फार्मा, पान मसाला, गुटखा, तंबाखू, कमोडीटी, सिनेमा आदी क्षेत्रांचा सामावेश आहे.

 

काळा पैशांच्या संचयनासाठी कोणत्याही प्रकारचे प्रमाण सध्या अस्तित्वात नाही, असे हा अहवाल सांगतो. यानुसार, नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लायड इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनसीआरएईआर) अभ्यासानुसार, १९८० ते २०१० दरम्यान भारताबाहेर ४९० अब्ज डॉलर इतकी जमा झाल्याचे अहवाल सांगतो.

 

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फायनांशिअल मॅनेजमेंटच्या (एनआयएफएम) माहीतीनुसार, १९९० ते २००८ दरम्यान, भारतातून २१८.४८ अब्ज डॉलरची संपती जमा झाल्याचा अहवाल आहे. हा आकडा भारतातील एकूण संपत्तीच्या १० टक्के असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

 

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक पॉलीसी अॅण्ड फायनान्स दरम्यान १९९७ ते २००९ मध्ये विकासदराच्या तुलनेत ०.२ ते ७.४ टक्के रक्कम देशाबाहेर गेली असल्याचा अंदाज व्यक्त केला. २०११ मध्ये अर्थमंत्रालयाने तिन्ही संस्थांना अघोषित उत्पन्नाबद्दल अहवाल सादर करण्यास सांगितला होता.

 

संसदीय समितीचा अहवाल

भारताबाहेर गेलेल्या काळ्यापैशांबद्दल अंदाज व्यक्त करणे कठीण काम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एम. वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या समितीने १६ व्या लोकसभेच्या अधिवेशनात २८ मार्च रोजी हा अहवाल सादर करण्यात आला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@