दिलजीत दोसांजच्या 'अर्जुन पटियाला' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2019
Total Views |

 

दिलजीत दोसांज आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत असणाऱ्या 'अर्जुन पटियाला' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. प्रामाणिकपणा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, त्यामुळे भारतातील सच्चेपणाने बनवलेला ट्रेलर आज आपल्यासाठी घेऊन आल्याचे चित्रपटकर्त्यांनी हा ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर आणताना म्हटले आहे.

ऍक्शन, विनोद, प्रेम या प्रेक्षकांना आकर्षित करू शकतील अशा सगळ्या गोष्टी या चित्रपटामध्ये आहेत. दिलजीत आणि क्रिती यांच्याबरोबरच वरुण शर्मा, रोनित रॉय, सनी लेओन हे देखील चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

रोहित जुगराज दिग्दर्शित 'अर्जुन पटियाला' चित्रपटाची कथा रितेश शाह आणि संदीप लेझल यांनी लिहिली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिलजीत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र या पोलीस ऑफिसरची मजेदार गोष्ट या ट्रेलमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा ट्रेलर बघताना नकळत प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य येईल हे नक्की.या चित्रपटाला सचिन आणि जिगर यांनी संगीत दिले असून हा चित्रपट २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@