'डोन्ट से भंगी' ; आयुषमान खुरानाचा प्रेक्षकांना संदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2019
Total Views |



तरुणाईचा लाडका आयुषमान खुराना कायमच एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येतो. यावेळी देखील त्याचा 'आर्टिकल १५'  हा आगामी चित्रपट संविधानातील कलम १५ वर आधारलेला आहे. याच कालमाशी निगडित एक संदेश आयुषमान खुराना याने त्याच्या प्रेक्षकांना आज सोशल मीडियाच्या माध्यमांवरून दिला आहे. "डोन्ट से भंगी" असा हॅशटॅग सुरु करून त्याने, जातीवरून भेदभाव करू नका असा संदेश दिला आहे. या आधी त्याने असाच एक संदेश दिला होता.

 

दिवसातून बऱ्याच वेळा आपण कळत नकळत अनेक शब्दांचा वापर करत असतो. काही वेळा तर त्या शब्दांचा अर्थ देखील आपल्याला माहित नसतो असाच एक शब्द म्हणजे 'भंगी'. मुम्बैय्या हिंदी मध्ये बऱ्याचदा 'अबे भंगी इधर आ ना' असे शब्द कित्येक वेळा आपल्या कानावर पडले असतील. मात्र हा एक जातीवाचक शब्द आहे हे आपल्या पैकी किती जणांना माहित आहे? आणि माहित असल्यास आपण हा शब्द कसा काय वापरू शकतो यावर विचार होणे गरजेचे आहे.

भारताच्या संविधानात प्रत्येक नागरिकाला काही हक्क आणि जबाबदाऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व हक्कांचे आणि कर्तव्यांचे पालन व्हावे यासाठी कायदे आहेत त्यापैकीच एक कायदा म्हणजे कलम १५. हे कलाम धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माच्या स्थानावरील भेदभावाचा निषेध दर्शवणारे आणि त्याविरुद्ध कारवाई करणारे कायदे नमूद करणारे कलम आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@