भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी केंद्राची 'स्वच्छता मोहीम' : १५ अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2019
Total Views |




नवी दिल्ली : 'मोदी २' सरकारने प्रशासकीय स्तरावर सुरू असणारा भ्रष्टाचार नाहीसा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी निर्मला सितारामन यांच्या मंत्रालयाने अधिकारी व सीमाशुल्क आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर विभागातील १५ अधिकाऱ्यांना घरी बसवले आहे. त्यातील काही अधिकाऱ्यांचे यापूर्वीच निलंबन करण्यात आले होते.

 

निर्मला सितारामन यांनी अर्थमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी कठोर पावले उचलण्याची सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात एकूण १२ अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली होती. त्यानंतर एकूण १५ अधिकाऱ्यांना घरी पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारतर्फे अधिकाराचा वापर करत ही कारवाई करण्यात आली आहे.

 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमाशुल्क विभागातील ज्या १५ अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली आहे. मुख्य आयुक्त डॉ. अनुप श्रीवास्तव, आयुक्त अतुल दीक्षित, आयुक्त संसार चंद, आयुक्त जी. श्री. हर्षा, आयुक्त विनय ब्रिज सिंग, अतिरिक्त आयुक्त अशोक महिदा, उपायुक्त अमरेश जैन, सह आयुक्त नलीनकुमार, सहायक आयुक्त एस. एस. पबाना, एस. एस. बिश्ट, विनोद संगा, अतिरिक्त आयुक्त राजू सेकर, उपायुक्त अशोक अस्वाल, सहायक आयुक्त मोहम्मद अल्ताफ, आदी अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@