वैशाली माडेचे ए.आर. रेहमानसोबत गाण्‍याचे स्‍वप्‍न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019
Total Views |



'बिग बॉस' घरातील स्‍पर्धक अनेक स्‍वप्‍नं पाहत असल्‍याचे आणि ती स्‍वप्‍नं पूर्ण होण्‍याची इच्‍छा बाळगून आहेत असे वाटते. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये दिगंबर नाईक, बाप्‍पा आणि अभिजीत केळकरसह वैशाली माडे गार्डनमध्‍ये बसलेले दिसत आहेत. अभिजीत वैशालीला तिच्‍या सर्वात मोठ्या स्‍वप्‍नाबाबत विचारत आहे.

 

सुरूवातीला वैशाली काहीशी शांत राहते, पण नंतर म्‍हणते, ''आता मला एकच ड्रीम आहे, मला एआर रेहमानबरोबर काम करायचयं.'' दिगंबर व अभिजीत तिला शुभेच्‍छा देत म्‍हणतात, ''तथास्‍तु, तथास्‍तु.'' वैशाली पुढे म्‍हणते, ''एआर रेहमानबरोबर गायचंय मला. त्‍यांच्‍यामध्‍ये गायचंय आणि त्‍यांच्‍यासोबत रेकॉर्डिंग करायचंय.''

 

वैशाली मनोरंजन क्षेत्र किती अनपेक्षित आहे याबाबत सांगत म्‍हणते, ''हे इतकं अनप्रेडीक्‍टेबल फिल्‍ड आहे, कधीही काहीही होऊ शकतं. कधीही कॉल येऊ शकतो, सांगते ना मी, इथे ज्‍यादिवशी निघाले सकाळी, त्‍या सकाळी मला फोन आला अंकित तिवारीच्‍या ग्रुपमधनं की ह्या आठवड्यात काय शेड्यूल आहे तुझं?.'' आम्‍ही आशा करतो की, ए.आर. रेहमान हे ऐकत असेल आणि वैशालीचे दिग्‍गजासोबत गाण्‍याचे स्‍वप्‍न लवकरात लवकर पूर्ण होवो!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@