वाचकपत्र : हिंदू सणांवर विनोद नको !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019
Total Views |



वटपौर्णिमा झाली की हिंदू सणाला सुरुवात होते. सणांच्या निमित्ताने जसे शुभेच्छा आणि सणांची माहिती देणारे संदेश सामाजिक माध्यमांतून फिरू लागतात तसे, या सणांचे विडंबन करणारे आणि त्यांवर विनोद करणारे संदेशही फिरू लागतात.

 

हिंदू धर्मातील प्रत्येक सणामागे धर्मशास्त्र असून तो सण कशाप्रकारे साजरा करावा याविषयीचे सविस्तर ज्ञान आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी मांडून ठेवले आहे. कालानुरूप सृष्टीत होत जाणारे बदल तसेच धर्मग्रंथातील सत्यकथा यांचा आधार या सण आणि उत्सवांमागे दडलेला असतो. प्रत्येक गोष्ट ही ईश्वराचेच रूप असून जीवसृष्टीसह निर्जीव वस्तूतही त्याचे अस्तित्व असते, त्यामुळे या सर्वांचा सन्मान करण्याची शिकवण या सणांच्या माध्यमांतून आपल्याला मिळत असते.

 

वटपौर्णिमेला वडाला म्हणजेच वृक्षाला पुजले जाते. नागपंचमीला नागाला, तर पोळ्याच्या दिवशी बैलाला पुजले जाते. दसऱ्याच्या दिवशी वापरातील उपयुक्त शस्त्रांचे आणि वस्तूंचे पूजन केले जाते. पितृपक्षाच्या निमित्ताने कावळ्याच्या रूपाने पूर्वजांना घास भरवला जातो. अशाप्रकारे चराचरावर निरपेक्ष प्रेम करायला शिकवणारे हिंदू धर्मातील सण हिंदू धर्माचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.

 

आताच्या पिढीवर असलेला पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आणि घरातून धार्मिकतेचे न मिळणारे संस्कार यांमुळे हिंदूंच्या सण-उत्सवांवर विनोद करताना आणि ते फॉरवर्ड करताना यांना काहीच वाटत नाही; मात्र ज्यांना आपल्या सण आणि उत्सव याविषयी आस्था आहे त्यांनी असे संदेश पुढे न पाठवता अशा विनोदवीरांना सणांमागील शास्त्र समजावून सांगावे,

- सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@