रावसाहेब दानवे व अरविंद सावंत यांनी घेतली मराठीत शपथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : १७व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. याआधी विरेंद्र कुमार यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यानंतर नवनिर्वाचित खासदारांना लोकसभा सदस्यपदाची शपथ देण्यात आली. यावेळी जालन्याचे खासदार रावसाहेब दावने व दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांनी मराठीत घेतली. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी पार पडला.

 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्तेविकास तथा सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री व नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नितीन गडकरी यांनी देखील लोकसभा सदस्यपदाची शपथ घेतली. तसेच दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक, माहिती व तंत्रज्ञान तथा मनुष्यबळ विकास विभागाचे राज्य मंत्री आणि अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांनीही आज शपथ घेतली.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्री व सभागृहाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. दरम्यान, सोमवार आणि मंगळवारी नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@