संसद अधिवेशन : तिहेरी तलाक, शैक्षणिक आरक्षण, जम्मू काश्मिर आरक्षण, आधारसह अन्य विधेयकांवर होणार चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019
Total Views |




नवी दिल्ली : १७व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. सोमवार आणि मंगळवारी नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात येणार आहे. हंगामी सभापतिपदी मध्य प्रदेशच्या टिकमगडचे खासदार वीरेंद्र कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. १९ जूनला लोकसभा सभापतींची निवड केली जाणार आहे. संसदेचे हे अधिवेशन २६ जुलैपर्यंत सुरू असणार आहे. यावेळी तीन तलाकसह अनेक महत्त्वाची विधेयके सादर केली जाणार आहे. या अधिवेशनात मागील सरकारच्या वेळी लागू १० अध्यादेश रद्द करून त्यांच्या जागेवर नवीन विधेयके मंजूर केले जाणार आहेत. गेल्या लोकसभेसह रद्द झालेली ४६ विधेयकांमध्येही बदल केले जाणार आहेत. भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ५ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ४ जुलैला आर्थिक सर्वेक्षण सादर होणार आहे.

 

असे असेल लोकसभेतील कामकाज

 

· १७ जून : १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात.

· १८ जून : पंतप्रधानांसह ५४३ नव्या खासदारांचा शपथविधी.

· १९ जून: लोकसभा अधिवेशनाची सुरुवात होईल.

· २० जून: १७ व्या लोकसभा सभापतींची निवड

```· जुलै : आर्थिक सर्वेक्षण सादर

· जुलै : नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडणार

 

महत्त्वाची विधेयके

 

केंद्रीय शैक्षणिक संस्था (शिक्षक संवर्गात आरक्षण) विधेयक २०१९

आधार आणि इतर कायदे (दुरुस्ती) विधेयक २०१९

मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) किंवा तिहेरी तलाक विधेयक २०१९

जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक २०१९

आंतरराष्ट्रीय मध्यस्थता केंद्र विधेयक २०१९

विशिष्ट आर्थिक क्षेत्र (दुरुस्ती) विधेयक २०१९

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@