मोदी सरकारचे बजेट कसे असावे ? नोंदवा तुमचे मत थेट सरकारकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकांनंतर मोदी सरकारचे दुसऱ्या टप्प्यातील पहीला अर्थ संकल्प ५ जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारमन या नवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान या प्रकरणी आता ११ जून ते २३ जूनपर्यंत अर्थशास्त्र, बॅंका, अधिकारी, वित्तीय संस्था आणि उद्योग मंडळांशी चर्चा केली जाणर आहेत.



याशिवाय २० जून रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत विविध राज्यांचे अर्थमंत्र्यांकडूनही सूचना मागवण्यात येणार आहेत. सोशल मीडियाद्वारे सर्वसाधारण जनतेकडूनही सल्ला मागवण्यात येणार आहे. अर्थशास्त्राचे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ आणि इतर सर्वसामान्यांनी बजेट संदर्भात आपला मोलाचा सल्ला द्यावा, असे निर्मला सीतारमण यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


 

सर्व सामान्य जनतेने आपला सल्ला द्यावा यासाठी २० जूनपर्यंत mygov.in या संकेतस्थळावर लॉग इन करून सल्ला द्यायचा आहे. लॉग इन केल्यावर बजेटवर सल्ला देण्यासाठीच्या लिंक वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर नवे पेज दिसेल. तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसेल तर पहिल्यापासून सर्व माहीती भरावी लागेल. दरम्यान, QR code द्वारेही रजिस्ट्रेशन करावे लागेल. एसएमएसद्वारे रजिस्ट्रेशन करता येऊ शकते.


 

यापूर्वी मोदी सरकारने पीयुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. अंतरिम अर्थसंकल्प हा तीन महिन्यांसाठी सादर केला जातो त्यानंतर निवडून येणारे सरकार संपूर्ण वर्षाचा संकल्प सादर करते. त्यानुसार आता ५ जुलै रोजी निर्मला सितारमन या पुढील अर्थसंकल्प सादर करणार आहेत.



 

केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यात निर्मला सितारामन यांच्यासह राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर, मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती सुब्र्हमण्यम आदींचा सामावेश आहे. यांच्यासह वित्त सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली वित्त सचिव गिरीश चंद्र, राजस्व सचिव अजय भूषण पांडेय, दीपम सचिव अतनु चक्रवर्ती आणि वित्त सेवा सचिव राजीव कुमार यांचाही सामावेश आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@