बिहारमध्ये उष्माघाताचे १८४ बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019
Total Views |



पाटणा : एकीकडे महाराष्ट्राला मान्सूनचे वेध लागले असताना दुसरकिडे बिहारमध्ये उष्माघाताने कहर केला आहे. आतापर्यंत बिहारमध्ये उष्माघाताचे १८४ बळी गेले आहेत. दक्षता म्हणून ३० जूनपर्यंत सर्व सरकारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. तसेच, गया येथील जिल्हाधिकाऱ्यांनी १४४ कलम लागू केले आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान कोणतेही सरकारी अथवा खासगी बांधकाम, मनरेगा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उघड्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

यामुळे राज्यातील परिस्थिती बिकट झाली असून राज्य सरकार त्याबाबद्दल ठोस प्रयत्न करत आहे. उष्माघातामुळे आतापर्यंत अंदाजे १०० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या ४८ तासांमध्ये ११३ जणांना मृत घोषित करण्यात आले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच नितीश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती पाऊले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@