बिहारमध्ये 'चमकी'ने घेतला १२५ चिमुकल्यांचा जीव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019
Total Views |



पाटणा : बिहार जिल्ह्यामध्ये 'चमकी' म्हणजेच मेंदूज्वार या तापाने हैदोस घातला आहे. या तापामुळे राज्यात आतापर्यंत १२५ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. अजूनही हा ताप आटोक्यात आला नसून यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लहान मुलांना या तापाची लागण होते. त्यांची तब्ब्येत झापाट्याने खालावते. ते मृत्यूच्या दाढेत ओढले जातात. या तापाच्या प्रकोपाने बिहार हादरून गेले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून या तापाने मुजफ्फरकरांची झोप उडाली आहे. जिल्ह्यातल्या सर्व सरकारी दवाखाने भरले असून उपचारासाठी डॉक्टरांची कुमक इतर जिल्ह्यातून मागविण्यात आलीय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकतीच इथे येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पीडित कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदतही जाहीर केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अजुन मुझफ्फरपूरला भेट दिली नाही अशी टीका विरोधकांनी सुरू केली आहे. मुझफ्फरपूरशिवाय इतर जिल्ह्यांमध्येही या तापचे लोण पसरत असल्याचे आढळून आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@