राम मंदिरासाठी सरकारने अध्यादेश काढावा : उद्धव ठाकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2019
Total Views |



अयोध्या : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेच्या सर्व खासदारांसह अयोध्येत जाऊन रामजन्मभूमीचे दर्शन घेतले. अयोध्येत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी सरकारने अध्यादेश आणावा आणि कायदा करून भव्य राम मंदिराची उभारणी करावी, अशी मागणी केली.

 

ठाकरे म्हणाले, "भारतीय जनता पक्षाकडे बहुमत आहे. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) सर्व पक्षही त्यांच्यासोबत आहेत. आपल्याकडे खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे अध्यादेश आणून आपण राम मंदिर बांधू," असे उद्धव म्हणाले. "मी गेल्या वर्षी अयोध्येत आलो होतो. तेव्हा पुढील वर्षी पुन्हा येईन, असे आश्वासन दिले होते. आज मी माझे आश्वासन पूर्ण केले आहे." ठाकरे यांनी एनडीए सरकार लवकरच अयोध्येत राम मंदिर बांधेल, असा विश्वास व्यक्त केला. "उद्यापासून संसदेचे कामकाज सुरू होत असून रामाचे दर्शन घेऊनच शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार आपली नवी इनिंग सुरू करत आहेत," असे उद्धव म्हणाले.

 

'पहिले मंदिर फिर संसद'

अयोध्यावारी करणाऱ्या उद्धव यांनी आज ‘पहले मंदिर, फिर संसद’ अशी घोषणा दिली. निवडणुकीपूर्वी केलेल्या अयोध्या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा दिला होता. राम मंदिर व्हावे, ही लोकांची इच्छा आहे. नरेंद्र मोदी सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे. राम मंदिर व्हावे असे बाळासाहेबांनाही वाटत होते. हिंदू लोकांनी एकत्र राहावे यासाठी शिवसेनेने कधीही महाराष्ट्राच्या बाहेर निवडणुका लढविल्या नाहीत," असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@