युवराजची निवृत्ती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2019
Total Views |
तसा विचार केला, तर मानवी जीवनात निवृत्ती हा काही खूप आश्चर्याचा विषय नाही. साधी सरकारी चाकरी असो, की कार्पोरेट जगतातले दमछाक करणारे विसकळीत जीवन, राजकारण असो की कलाक्षेत्र, निवृत्त व्हावेच लागते माणसाला कधी ना कधी. ज्यांना निवृत्तीची नेमकी वेळ उमगली अन् झगमगाटाच्या वलयातून बाहेर पडण्याचा निर्णय योग्य वेळी सहज घेता आला, त्यांचा रतन टाटा, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर होतो. बाकी, त्या मोहात अडकलेल्यांची गणतीही कमी नसते.
===
‘‘क्रिकेट...! काही लोकांसाठी फक्त खेळ असेल. काही लोकांसाठी त्यांचा धर्म. पण माझ्यासाठी...? आयुष्याचा अर्थही पुरता उमगला नव्हता अजून, तेव्हापासून मी क्रिकेटच्या सोबतीने जगतोय्. क्रिकेट फक्त खेळलो नाही, तर अक्षरश: जगलो. आयुष्यात आज जे जे म्हणून गाठीशी आहे, ते सारंकाही या खेळानं दिलं. नाव, पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता... नुसतं विमानतळावरून बाहेर पडलं, तरी आजूबाजूला जमणारी गर्दी, एका ऑटोग्राफसाठी मागेपुढे फिरणारी पोरं... सारं, सारंकाही या खेळानं दिलं. आजवर क्रिकेटवर प्रेमच इतकं मनापासून केलं की, त्या खेळाशी प्रतारणा अशी कधी करताच आली नाही. खूप काही घडले गेल्या पंचेवीस वर्षांच्या काळात. धडपडलो. पडलो. खचलो. जयपराजयाचा काळ अनुभवला. पडल्यानंतर उठून उभं कसं राहायचं ते शिकलो. स्वत:ला सांभाळण्याचा सराव झालाय् एव्हाना. खरंतर यशापेक्षाही अपयशालाच गवसणी घालत राहिलो या कालावधीत. यशाचा पाठलाग करायचं मात्र सोडलं नाही कधी. इथून पुढच्या प्रवासात, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याची तीच तर्हा कायम अनुसरणार आहे मी...’’
 
 
 
निवृत्तीचा मुहूर्त साधून युवराजिंसग- क्रिकेट रसिकांचा लाडका युवी- बोलत होता. चेहरा हिरमुसलेला. डोळ्यांतल्या अश्रुधारा लपवण्याचा प्रयत्न कसोशीने चाललेला. त्या प्रयत्नांना अलबत हुलकावणी देत हुंदके दगा देताहेत आणि युवी मात्र, कधी डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा कोरड्या करत, तर कधी गळ्यात दाटून आलेले आवंढे गिळत क्रिकेटमधील कडूगोड अनुभवाचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करतोय्. समोर बसलेला सारा समुदाय क्षणभर अवाक् झालेला. डोकं सुन्न, मनं सैरभैर झालेली. आपला लाडका युवी यानंतर क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही, ही कल्पनाच कल्पनेपलीकडची होती कित्येकांसाठी.
 
चंडीगढमधील एका शिख कुटुंबात जन्माला आलेला युवी तसा बालपणापासूनच क्रिकेटचे बाळकडू प्यालेला. वडील योगराजिंसग हेदेखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले एक उत्तम क्रिकेटपटू. स्वाभाविकच युवीवर आईपक्षाही वडिलांचा प्रभाव अधिक. डावखोरा फलंदाज, उत्तम गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पाडणार्या युवराजिंसगसंदर्भात क्रिकेटसोबतच वैयक्तिक आयुष्यातील चढउतारही दखलपात्र ठरलेत. मानाचे मानले जाणारे ‘पद्मश्री’, ‘अर्जुन’ अशा विविध पुरस्कारांचा मानाचा तुरा खोवला गेला असल्याने करीअर देदीप्यमान झालेले. पण, दरम्यानच्या काळात वाट्याला आलेला संघर्षाचा टप्पा मात्र कायम स्मरणात राहील असाच होता. कर्करोगाने छळले ते वेगळेच, पण चांगली खेळी खेळूनही संघाबाहेर राहण्याची वेळही सोबत्यांच्या राजकारणातून उद्भवली. पण, आकाशाला स्पर्श करूनच थांबण्याचा दृढनिश्चय दरवेळी पिच्छा पुरवायचा अन् मग यश नाइलाजाने पाठलाग करत मागे यायचं. गेली कित्येक वर्षे हाच प्रघात सुरू आहे. यशापयश म्हणजे जणू ऊन-सावल्यांचा खेळ झाला होता. 2011 ची विश्वचषक स्पर्धा आपल्या आगळ्या खेळाचे प्रदर्शन घडवीत गाजवणारा युवराज, नंतरच्या काळात कॅन्सरशी झगडत राहिला. अर्थात तो या रोगालाही पुरून उरला. दरम्यानच्या काळात टीममधील पुनर्प्रवेश, विविध विक्रमांची नोंद, आदी टप्पेही विनासायास पार पडले. 2014 आणि 2016 च्या आयपीएल सामन्यांसाठी जेव्हा बंगळुरू आणि दिल्ली संघासाठी सर्वात महागडा खेळाडू ठरण्याचे भाग्य वाट्याला आले, तेव्हा डोळ्यांत पुन्हा एकदा पाणी तरळले. पत्नी हेजल नुसती बघत राहिली होती. नि:शब्द. तिला कळेच ना, षट्कारांची बरसात करून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना अक्षरश: घाम फोडणारा हा असा रांगडा गडी, क्रिकेटची कीट दाराशी आली म्हणून असा भावनावेगात का वाहतोय्? डोळ्यांतून घळाघळा अश्रुधारा का वाहताहेत त्याच्या? त्याच्यासाठी क्रिकेटही नवे नव्हते की कीटही नवीन नव्हती, अशा स्थितीत युवराजचे भावनाप्रधान होणे सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारे होते. पण, ज्यांनी मध्यंतरीच्या काळातील त्याच्या आयुष्याच्या प्रवासातले चढउतार बघितले होते, त्याने सहन केलेले टक्केटोणपे अनुभवले होते त्यांना, आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील एकाहून एक सामने एकापेक्षा एक अशा विक्रमांनी सजविणार्या एका खेळाडूच्या जीवनात, त्याच्या प्रिय अशा खेळापासून दूर राहण्याची वेळ ओढवल्यानंतर, दखलपात्र ठरावे एवढ्या कालांतराने पुन्हा क्रिकेटजगतातील प्रवेश किती मोलाचा असेल, हे सहज उमगण्यासारखे होते. इतरांना मात्र युवराजच्या डोळ्यांतील पाणी बुचकळ्यात टाकणारे होते.
 
तसा विचार केला, तर मानवी जीवनात निवृत्ती हा काही खूप आश्चर्याचा विषय नाही. साधी सरकारी चाकरी असो, की कार्पोरेट जगतातले दमछाक करणारे विसकळीत जीवन, राजकारण असो की कलाक्षेत्र, निवृत्त व्हावेच लागते माणसाला कधी ना कधी. ज्यांना निवृत्तीची नेमकी वेळ उमगली अन् झगमगाटाच्या वलयातून बाहेर पडण्याचा निर्णय योग्य वेळी सहज घेता आला, त्यांचा रतन टाटा, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर होतो. बाकी, त्या मोहात अडकलेल्यांची गणतीही कमी नसते. निमित्त नोकरीचे असो की मग राजकारणाचे. माणूस एकदा का त्या स्पर्धेत उतरला की, सार्या बाबी ओघाने वाट्याला येतातच. स्पर्धा, शर्यत, हेवेदावे, एकमेकांना मागे खेचण्याचे षडयंत्र, विरोधातली कटकारस्थानं... पैसा, प्रसिद्धी, यश, लोकप्रियतेचा परीघ जितका मोठा तितकी या सार्या बाबींची तीव्रता अधिक. मग, स्पर्धाही तेवढीच मोठी अन् विरोधातले डावपेचही त्याच तोडीचे असतात. मुळात, हे वास्तव स्वीकारण्याचे धाडस ज्यांना अंगी बाणवता आले, पुढे त्यांनाच जाता येते. यशाचा चढता आलेख त्यांच्याच नावावर नोंदवला जातो. स्वभाव, कार्य, कर्तृत्व, कर्तव्यपूर्तीचे सातत्य यातून कर्तबगारीचा, यशापयशाचा आलेख तयार होतो. लोकप्रियता, स्वीकारार्हता त्यातून प्रवाहित होते. सदासर्वकाळ परिस्थिती सारखीच राहील असे नाही. आकाशाला गवसणी दरवेळी घालता येईलच असेही नाही. कधीकधी अपयश पाठलाग करत मागे येत राहतं. षट्कारांच्या बरसातीची लोकांची अपेक्षा दरवेळी पूर्ण करता येतेच असेही नाही. एकही धाव न काढता, मैदानातून आल्या पावली परतण्याची वेळही येते बर्याचदा. क्रिकेटशिवायच्या इतर क्षेत्रातली धावाधावही ही अशीच असते. उजेड-अंधाराचे जाळे विणणारी. कधी यश, तर कधी अपयशाचा सामना करावा लागणारी. बरं, माणसं तरी कुठे सारखं वागतात दरवेळी? परिस्थिती जराशी बदलली की तर्हा बदलतात सार्यांच्या. यशोशिखरावर असलेल्या माणसाच्या सभोवतालच्या गराड्यातली सारीच गर्दी त्याच्या वाईट परिस्थितीतही सोबतीला असेलच, याची ग्वाही देता येत नाही. सहसा येणार्या असल्या अनुभवाची शिदोरी युवराजच्या गाठीशीही होतीच निवृत्तीच्या टप्प्यावर. क्रिकेट, खाजगी आणि सार्वजनिक जीवनातले चढउतार, क्षणाक्षणाला बदलत गेलेले लोकांच्या चेहर्यांवरचे हावभाव, अपेक्षा नसताना कुणाकडूनतरी मिळालेली मदत, अपेक्षा नसताना कुणाकडून झालेली दगाबाजी... एकूणएक प्रसंगांचे कढ, युवीच्या बोलण्यातून, शब्दांआडून जाणवणारे हुंदके, ते थांबवण्याचा कसोशीने झालेला प्रयत्न... कडू-गोड आठवणींचे डोंगर... सारेच बोलके होते. एका नामवंत खेळाडूपेक्षाही एक सामान्य माणूस त्यातून डोकावत होता. त्याच्या चेहर्यावरच्या काळवंडलेल्या, बोलक्या रेषांमधून, नकळत रोखण्याचा प्रयत्न केलेल्या पापण्यांआडच्या धारांतून, सामान्य माणसाची तीच भावना झळकत होती. कदाचित आपल्या क्षेत्रातून आपण निवृत्त होऊ, भावना व्यक्त करण्यासाठी चार लोकांसमोर आपण उभे असू, तेव्हा आपल्या भावनाही अशाच असतील का, असा प्रश्न बहुतेकांच्या मनात यावा, अशा तर्हेने युवीच्या मनातील भावभावनांचा कल्लोळ मांडला गेला होता- त्यातील कोरडेपण अन् ओलाव्यासह... खरंतर ती निवृत्ती युवराजची होती. भाषणही त्याचंच होतं. पण, त्याच्या शब्दांतून व्यक्त मात्र, ऐकणारा प्रत्येक जण होत होता... म्हणूनच की काय, पण त्या भावना ऐकताना मनं सैरभैर होण्याची वेळ ते ऐकणार्यांवर आली होती...
@@AUTHORINFO_V1@@