'नच्या गॉट अ गर्लफ्रेंड' हे गाणे १८ जून ला प्रदर्शित होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2019
Total Views |


नचिकेतला अखेर त्याची अलिशा मिळाली आणि अमेय वाघच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. आता याच पार्श्वभूमीवर
'नच्या गॉट अ गर्लफ्रेंड' हे 'गर्लफ्रेंड' या चित्रपटातील नवीन गाणे येत्या १८ जून ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याच गाण्याची एक छोटीसी झलक चित्रपटामधील 'अलिशा' ने म्हणजेच नचिकेतच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारणाऱ्या, सर्वांच्या लाडक्या सई ताम्हणकरने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

"माझा नचू कसा धिंगाणा घालतोय बघा" असे म्हणत तिने या गाण्याचा टीजर पोस्ट केला आहे. या टीजरमध्ये अमेय वाघ एका वेगळ्याच रूपात दिसत असून हे एक पार्टी सॉंग असल्यासारखे वाटत आहे. गेले कित्येक दिवस नचिकेत त्याच्या अलिशाच्या शोधात होता आणि अखेर त्याला आपली गर्लफ्रेंड मिळाल्याच्या आनंदात तो बेधुंद होऊन नाचत आहे असे या गाण्याच्या टीजरमधून जाणवते.

 
 

उपेंद्र सिधये ज्या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकत आहे तो गर्लफ्रेंड हा चित्रपट येत्या २६ जुलैला प्रदर्शित होणार आहे. त्या आधी चित्रपटामध्ये काय काय मजा मस्ती आहे याची छोटी झलक आपल्याला या गाण्यामधून आणि आधी प्रदर्शित झालेल्या टीजर्समधून पाहायला मिळत असल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे हे निश्चित.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@