मालिकांमध्ये प्रादेशिक भाषा वापराने बंधनकारक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : टीव्ही मालिकांच्या सुरुवातीला आणि शेवटी प्रादेशिक भाषा वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वांना कलाकारांची नावे व इतर नावे कळावीत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.


हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधल्या दूरचित्रवाणी वाहिन्या, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधल्या मालिकांच्या कलाकारांची नामावली, आभार, शीर्षक केवळ इंग्रजीतून दाखवतात यामुळे अनेक लोक कलाकारांविषयी महत्वाच्या माहितीपासून वंचित राहत असल्याचे प्रसारण मंत्रालयाने सांगितले.

 

यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले, "कलाकारांची नामावली, आभार, शीर्षक निर्मात्यांना इंग्रजीत द्यायची असतील तर ती द्यावीत, यात कोणतीही अडचण नाही. मात्र ही नावे प्रादेशिक भाषांमध्येही देण्याची गरज असून त्यामुळे स्थानिकांना ही महत्वाची माहिती समजण्यास मदत होईल."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@