रविवार धमाका : भारत आणि पाकिस्तान महायुद्धावर पावसाचे सावट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2019
Total Views |


 


मुंबई : आयसीसी विश्वचषक २०१९मध्ये सगळ्यात जास्त 'हाय वोल्टेज' सामना रविवारी १६ जूनला इंगलंडमधील मॅन्चेस्टर मैदानावर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यादोघांमधील या क्रिकेट विश्वातील युद्धाकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे. बालाकोट हल्ला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील 'दुश्मनी' यामुळे या सामन्याचे महत्व आणखी वाढले आहे. मात्र या सामन्यावर पावसाचीही नजर आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट आहे.

 

भारताचा सामना ज्या मॅन्चेस्टरमध्ये होणार आहे, तेथे शुक्रवार जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे मैदानात पाणी साचले. ४८ तास उलटले तरीही पावसाची स्थिती कायम आहे. या पावसामुळे भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघाना फटका बसण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाचा विश्वचषकात एक-एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. रविवारचा सामनाही रद्द झाल्यास दोन्ही संघासाठी ही चिंतेची बाब असणार आहे. विश्वचषकातील भारताचा हा चौथा तर पाकिस्तानचा पाचवा सामना आहे.

 

भारताची पुन्हा चौथ्या स्थानावर घसरण

 

इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या सामन्यामध्ये इंग्लंडने विंडीजवर मात केली. त्यामुळे इंग्लंडने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असून भारत चौथ्या स्थानावर घसरला आहे. त्यामुळे जर पाकिस्तानविरुद्ध सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतासमोरील अडचणी वाढणार असल्याची चर्चा क्रिकेटच्या समीक्षकांनी केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@