३ इडियट्स नंतर करीना आणि आमीर एका चित्रपटात झळकणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2019
Total Views |



करीना कपूर खान सध्या अक्षय कुमार आणि दिलजीत डोसांज यांच्याबरोबर 'गुड न्यूज' या चित्रपटासाठी तसेच इरफान खान बरोबरच्या 'अंग्रेजी मिडीयम' या दोन चित्रपटांवर काम करत आहे. अशातच ३ इडियट्स नंतर पुन्हा एकदा करीना आणि आमिर खान 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाच्या माध्यमातून एका चित्रपटात काम करताना दिसणार आहेत.

सध्या करीना लंडनमध्ये 'अंग्रेजी मिडीयम' या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. दरम्यान भारतात परतल्यावर एका रिऍलिटी शोच्या शुटिंग नंतर 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल अशी चर्चा आहे. ३ इडियट्सनंतर या चित्रपटात आमिर खान आणि करीना मधील केमेस्ट्री अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट ऑक्टोबर महिन्याच्या आधीच प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात असून याचे कारण म्हणजे करण जोहर चा 'तख़्त' हा चित्रपट ऑक्टोबर नंतर प्रदर्शित होईल. तख्त चित्रपटामध्ये करीना कपूर बरोबरच आलिया भट, रणवीर सिंह, विकी कौशल, अनिल कपूर, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर अशी मोठी स्टारकास्ट झळकणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@