शूजित सरकारच्या चित्रपटात नोरा फतेही ची एन्ट्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2019
Total Views |




उधम सिंह यांच्या जीवनपटामध्ये नुकतीच नोरा फतेही या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या चित्रपटात विकी कौशल, उधम सिंह यांची मुख्य भूमिका साकारणार असून त्याच्या पत्नीची भूमिका नोरा साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. १९१९ मध्ये अमृतसरमधील जळियावाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी उधम सिंह यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतातील पंजाबचे माजी ल्युटेनंट गव्हर्नरचा वाढ केला या घटनेवर साहसी शहीद जवान उधम सिंह यांचा हा जीवनपट आधारलेला आहे.

या चित्रपटामध्ये एक प्रेम गीत असून या गाण्यामध्ये नोराचा देखील सहभाग आहे. हे एक टिपिकल प्रेमगीत नसून यामध्ये चित्रपटाची कथा उलगडणार आहे असे नोराने या गाण्याविषयी बोलताना सांगितले. या गाण्यामध्ये सहभागी होण्याची संधी 'सत्यमेव जयते' या चित्रपटामधील तिच्या 'दिलबर' या डान्स नंबर नंतरच आली असल्याचा खुलासा यावेळी तिने केला. तर हे गाणे अतिशय भावनिक असून यामध्ये आपण डान्स करत नसल्याचे देखील तिने यावेळी सांगितले.

पुढे बोलताना, या गाण्याचे शब्द ऐकल्यावर शहरे आल्याशिवाय राहणार नाहीत आणि गाण्याचे दिग्दर्शक अरविंदर खैर यांच्या कामाचे देखील तिने यावेळी तोंड भरून कौतुक केले आहे. त्यामुळे आता या चित्रपटाबरोबरच या नवीन गाण्याविषयीची उत्सुकता देखील वृद्धिंगत होईल.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@