'आयएमए'कडून कोटींची फसवणूक ; इस्लामिक बँकरचा देशाबाहेर पोबारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2019
Total Views |



बंगळुरू : ‘आय मॉनेटरी अॅडव्हायझरी’ म्हणजेच 'आयएमए' या इस्लामिक बँकच्या नावाने कोटींचा घोटाळा करून एकाने दुबईला पलायन केले आहे. मोहम्मद मंसूर खान हा 'आयएमए' ही इस्लमिक बँक चालवत होता. गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकमधील सुमारे २५ हजार जणांची फसवणूक केली. या फसवणुकीत गुंतवणुकदारांची सुमारे १ हजार ५०० कोटींची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. आयएमएच्या सात संचालकांना अटक करण्यात आली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

 

काही दिवसांपूर्वी मंसूरने सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. दरम्यान, त्याने मुस्लिम समुदायातील लोकांना लक्ष्य करत तब्बल १ हजार ५०० कोटी रूपये जमवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मन्सूरने त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पळ ठोकला होता. तसेच सध्या बंगळुरू शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, आयएमएकडून गुंतवणुकीवर सुमारे ८ ते १० टक्के व्याज देण्यात येत होते. फसवणूक झालेल्या २१ हजार जणांच्या तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. मंसूरचे जवळचे मित्र आणि व्यवसायातील भागिदार खालिद अहमद यांनी मंसूरविरोधात तक्रार दाखल केली होती. मंसूरने आपल्याला ४ कोटी ८ लाख रुपयांचा गंडा घातला असा खालिद यांचा आरोप आहे. या नंतर मंसूरचा आत्महत्येचा विचार बोलून दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतरच लोकांनी पोलिसात तक्रार केली, मात्र त्यापूर्वी मंसूर पळाला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@