प.बंगाल डॉक्टर मारहाण : देशभरातील डॉक्टर संपावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2019
Total Views |


 


मुंबई : कोलकत्यातील ज्युनियर डॉक्टरला पेशंटच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज राज्यातील निवासी तसेच इंटर्न डॉक्टर आंदोलन करणार आहेत. राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात मार्डचे निवासी डॉक्टर तसेच 'अस्मी'चे इंटर्न डॉक्टर्स निदर्शने करणार आहेत. यावेळी हातात काळी रिबीन बांधून तसेच हेल्मेट परिधान करून वेगवेगळ्या रुग्णालयात निषेध केला जाणार आहे. तसेच आपत्कालीन सेवा सोडून काम न करण्याचे आवाहन देखील केले आहे.

 

पुण्यातील बीजे वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मार्डचे डॉक्टरही या संपात सहभागी झाले आहेत. हा संप शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार असून तातडीची वैद्यकिय सेवा वगळता बाहयरुग्ण विभाग आणि वॉर्डमधील सेवा बंद राहणार आहेत. याबाबतची माहिती बीजे मार्डचे सचिव डॉ. अभिषेक जैन यांनी गुरुवारी रात्री दिली.

 

कोलकाता शहरातील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी एका वृद्धाचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी एका निवासी आणि एका इंटर्न डॉक्टरला मारहाण केली. डॉ. परिबहा मुखोपाध्याय आणि डॉ. यश टेकवानी या दोन डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली. यानिषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी हे पाऊल उचल्याचे सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@