शहीद कमांडोला सहकाऱ्यांनी वाहीली अशी श्रद्धांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2019
Total Views |


नववधूची अशी पाठवणी आजवर झाली नसेल


नवी दिल्ली : उद्योगपती हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तमाम भारतीयांचे डोळे पाणावले. गरूड कमांडो ज्योती प्रकाश नीरला यांना जम्मू काश्मीरच्या चकमकीत वीरमरण आले होते. त्यापूर्वी त्यांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्थान घातले होते. या पराक्रमासाठी त्यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले होते. नीरला यांच्य़ा आईने हा सन्मान स्वीकारला होता. त्यांचा गौरव करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही अश्रू अनावर झाले होते. मात्र, सध्या जे पी निरला यांच्या कुटूंबियांची परिस्थिती नाजूक बनली आहे. मात्र, नीरला यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी उचलत अवघ्या देशासमोर एक उदाहरण ठेवले आहे.




 

शहीद गरूड कमांडो ज्योतिप्रकाश नीरला यांच्या चार बहीणींपैकी एका बहीणीचा विवाह ठरला होता. मात्र, आर्थिक चणचण भासत असल्याने शुभकार्यात विघ्न येत होते. अशावेळी ज्योतिप्रकाश यांचे सैन्यदलातील सहकारी मित्रांनी ही जबाबदारी उचलली. प्रत्येकाला शक्य तितक्या रक्कमेची मदत त्यांनी नीरला कुटूंबियांना केली. लग्नासाठी एकूण पाच लाख रुपये त्यांनी जमा केले आणि आपल्या बहीणीप्रमाणे तिचे लग्न लावून दिले. मात्र, चर्चा ठरली ती एका वेगळ्याच गोष्टीची. नववधूची पावले जमिनीवर पडू नयेत यासाठी तिला आपल्या तळहातावरून मंडपापर्यंत नेले. हा आदर पाहून अनेकांना गहीवरून आले. आपल्या सहकाऱ्याला आगळीवेगळी श्रद्धांजली दिल्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नीरला कुटूंबियांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी देशभरातून त्यांना मदत करण्यात आली.

 



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@