क्रिकेटप्रेमींनी आयसीसीला धरले धारेवर #ShameonICC

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2019
Total Views |


 


मुंबई : आयसीसी विश्वचषक २०१९मध्ये पावसाचा फटका भारतालाही बसला. गुरुवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे एकही चेंडू न खेळात रद्द करण्यात आला. विश्वचषक २०१९मध्ये यापूर्वीदेखील ४ सामने रद्द करण्यात आले. यामुळे ज्या संघाचा सामना रद्द झाला त्या संघाना पॉईंट्स टेबलमध्ये मार खावा लागला. आधी पंचाच्या चुकीच्या निर्णय, धोनीच्या ग्लोव्ह्जवरील बंदी आणि आता पावसाच्या व्यत्ययामुळे क्रिकेटप्रेमींनी आयसीसीला चांगलेच धारेवर धरले आहे. सध्या आयसीसीविरोधात #ShameonICC चा ट्रेंड जोरात चालू आहे.

 
 
 

भारताचा सामना रद्द झाल्यानंतर अनेकांनी आपला राग ट्विटरवरून व्यक्त केला आहे. वेग्वेगळ्याप्रकारे मिम्स बनवून आयसीसीवर ताशेरे ओढले आहेत. आयसीसीला याबद्दल प्रश्न विचारले असता, "प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवले तर स्पर्धा लांबली असती. त्याचा फटका खेळपट्टीची तयारी, संघाला दुखापतीतून सावरण्याचा मिळणारा वेळ, राहण्याची सुविधा, पर्यटकांचा प्रवासाचा खर्च, या सर्वांना बसला असता. तसेच राखीव दिवशीही पाऊस पडणार नाही याची काय गॅरेंटी?" असे स्पष्टीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी दिले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@